राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय काढला आणि राज्यभरात गदारोळ माजला आहे. राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असं सूचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.